जळगांव – शहरातील नामवंत प्रथितयश सर्जन व भंगाळे परिवारचे आधारस्तंभ डॉ.अर्जुन दादा भंगाळे यांना वाढदिवसा निमित्त विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट घेत शुभेच्छांचा वर्षाव केला.
गेल्या अनेक वर्षापासून जिल्हाभरातील रुग्णांना जिव्हाळा पूर्ण सेवा देत त्यांचेवर प्रभावी व खात्रीशीर उपचार करणारे आदर्श डॉक्टर असा नावलौकिक प्राप्त
करणारे आदरणीय व्यक्तिमत्व महणून त्यांचया सामाजिक प्रतीमेने एक उंची गाठलेली आहे.
तसेच गंभीर रुग्णांना देखील त्यांच्या मोठ्या अनुभवाचा लाभ मिळत आहे .त्या मुळे रुग्ण व त्यांचा परिवार ,समाजातील गोर गरीब रुग्ण यांना डॉ.अर्जुन दादा भंगाळे यांचा दवाखाना आशेचा किरण ठरला आहे.
भंगाळे परिवारातर्फे ज्येष्ठ भ्राता रामदास भंगाळे यांनी त्यांना शुभ आशिर्वाद देवून उताम आरोग्य व अखंड जनसेवा घडत राहो ही भावना व्यक्त केली या प्रसंगी भंगाळे ज्वेलर्सचे संचालक भागवत भंगाळे,गोव.कॉन्ट्रॅक्टर शिवाजी भंगाळे, डॉ्.प्रकाश भंगाळे शामकांत भंगाळे,केमिस्ट भूषण सुनिल भंगाळे,शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे ,सागर भंगाळे, आकाश भंगाळे,यांचेसह डॉ.स्नेहल फेगडे आदींची उपस्थिती होती.
शहरासह जिल्हाभरातील सामाजिक ,राजकीय ,आर्थिक ,उद्योग ,व्यवसायिक आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ,हितचिंतकांनी,त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे .प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रथितयश सर्जन डॉ.अर्जुन दादा भंगाळे यांच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छांचा वर्षाव
अधिक वाचलेल्या बातम्या