जळगाव – (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)गेल्या दोन दशकांपासून सामाजिक पत्रकारिता करणाऱ्या मासिक ब्रह्मदंडच्या २०२५ चे अमृतवक्ता, ज्ञानयोगी, माजी संपादक,श्री.विवेक घळसासी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब जळगावचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. प्रदीप जोशी, गांधी रिसर्च फाउंडेशनचे गिरीश कुलकर्णी, संपादक अजय डोहोळे, अनघा डोहोळे यांची उपस्थिती होती.
घळसासी यांच्या देश – विदेशात अनेक व्याख्याने, राम कथा,भागवत कथा झालेल्या आहेत. प्राचार्य शिवाजीराव भोसले व प्राचार्य राम शेवाळकर यांनी वक्तृत्वाचे वारसदार विवेक यांचा गौरव केला आहे.
याप्रसंगी विवेक घळसासी यांनी ब्रह्मदंडच्या वाटचाली विषयी संवाद साधत दिनदर्शिकेचे अवलोकन करून शुभेच्छा दिल्या.