जळगांव – (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जाळगाव शहरात सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत ब्रह्मश्री परिवाराच्या पारायण ग्रुप तर्फे दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी श्रीगजानन विजय या धार्मिक व पवित्र ग्रंथाचे सामूहिक पारायण भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.
श्री. प्रशांत कुलकर्णी यांचे घरी आज रोजी गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ब्रह्मश्री पारायण ग्रुप तर्फे दर महिन्याला पारायण केले जाते. पिंप्राळा परिसरात वास्तव्यास असलेले प्रशांत कुलकर्णी व सौ. माधुरी कुलकर्णी यांचे घरी प्रसन्न वातावरणात हे सामूहिक पारायण मोठ्या संख्येने संपन्न झाले.या प्रसंगी ब्रह्मश्री परिवाराच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.