जळगांव – ( प्रतिनिधी) स्वामी नारायण प्राण प्रतिष्ठा सोहळ्या ठिकाणी एक स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला होता.. त्यात तपासणी कक्ष, औषध कक्ष ,रक्तदान कक्ष ,उपचार कक्ष ,असे उपकक्ष उभारण्यात आले होते..
त्यात डॉक्टर नितीन भारंबे पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर देवेंद्र चौधरी भुलतज्ञ त्यांच्यासोबत पाच डॉक्टर्स व इतर सहाय्यक स्टाफ आपल्या सर्व उपकरणासह व सोयी सुविधा सह उपस्थित राहून सेवा देत होते. सकाळ सत्र व व दुपार सत्र असे. सकाळी साडेसात ते रात्री साडेदहा पर्यंत मेडिकल कॅम्प ओपन असे. याशिवाय दोन ॲम्बुलन्स 24 तास सज्ज ठेवल्या जात होत्या.
गेल्या दहा दिवसात २५६ पेक्षा जास्त आकस्मात उपचार करण्यात आले शिवाय गेल्या दहा दिवसात 222 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची नोंद करण्यात आली.अशाप्रकारे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे श्रीस्वामीनारायण प्राणप्रतिष्ठा महोत्सवात फार मोठे योगदान लाभले आहे.