नवी दिल्ली – युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय,नवी दिल्ली येथे माननीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आज भारतीय कृषी विमा समिती (AIC),आयसीआयसीआय बँक आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीत रबी-२०२४ हंगामासाठी जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील विविध बिंदूचा आणि त्रुटीचा आढावा घेण्यात आला.
आयसीआयसीआय बँकेने १५०० हून अधिक शेतकऱ्यांची माहिती पीक विमा पोर्टलवर वेळेत अद्ययावत करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीबद्दल चर्चा केली. केळी उत्पादक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) खातेदार आहेत. योजना मार्गदर्शिकेनुसार, बँकेने ३१ ऑक्टोबर २०२४ च्या आत त्यांचा विम्याचा हप्ता कापून विमा कंपनीकडे पाठवणे आवश्यक होते, माहिती अद्ययावत करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२४ होती तथापि, बँकेला येणाऱ्या अडचणी बद्दल या बैठकीत चर्चा करण्यात आली. बँकेने २५ नोव्हेंबर २०२४ रोजी ही समस्या अधोरेखित करण्यावर लक्ष वेधले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांवर कसल्याच प्रकारचा परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
बैठकीत आयसीआयसीआय बँकेकडून यासंबंधी सविस्तर चर्चा करून तातडीची सुधारणा करत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, याबद्दल श्रीमती खडसे यांनी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे निर्देश दिले.