Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याट्रिपल व्हेसल्स डिसीज असलेल्या बर्‍हाणपूरच्या रूग्णाला बायपासने दिले जीवदान डॉ. उल्हास पाटील...

ट्रिपल व्हेसल्स डिसीज असलेल्या बर्‍हाणपूरच्या रूग्णाला बायपासने दिले जीवदान डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या हृदयालयातील तज्ज्ञांच्या अथक प्रयत्नांना यश


जळगाव – ट्रिपल व्हेसल्स डिसीज असलेल्या बर्‍हाणपूर येथील ५७ वर्षीय रूग्णावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाच्या हृदयालयात बायपासची शस्त्रक्रिया हृदयविकार तज्ज्ञांच्या अनुभव अन् कौशल्यामुळे यशस्वी ठरली. अत्यंत जोखमीची ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने रूग्णाने रूग्णालयाप्रती ऋण व्यक्त केले.

याबाबत माहिती अशी की, बर्‍हाणपूर येथील कैलास सोनावर (वय ५७) यांना काही दिवसांपासून छातीत दुखणे सुरू होते. त्यांनी स्थानिक ठिकाणी उपचार घेतले. काही काळ आराम मिळाल्यानंतर त्यांचे छातीचे दुखणे वाढले. अखेरीस त्यांनी उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय गाठले. याठिकाणी हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांनी कैलास सोनार यांच्या हृदयाची एन्जीओग्राफीची तपासणी केली

. या तपासणीत हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या दोन धमन्या १०० टक्के आणि एक ८० टक्के बंद होती. तसेच रूग्ण कैलास सोनार यांचे वजन देखिल अधिकचे असल्याने भूल देऊन शस्त्रक्रिया करणे जोखमीचे ठरणारे होते. ही जोखीम स्विकारून कैलास सोनार यांच्यावर बायपासची शस्त्रक्रिया करण्यात आली. रूग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारू लागल्याने स्विकारलेली जोखीम यशस्वी ठरल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

तसेच रूग्णाच्या कुटूंबियांनी देखिल हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांचे ऋण व्यक्त केली. शस्त्रक्रियेसाठी भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. वर्षा कुळकर्णी, स्टाफ नर्स अहिंसा भंगाळे, निकीता यांनी सहकार्य केले.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या