जळगाव दि. 18 – येथील प्रतिथयश व निष्णात हृदय रोग तज्ञ *डॉ सुभाष भास्कर चौधरी* (वय 79) यांचे अल्पशा आजाराने आज 6 वाजून 15 मिनिटांनी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी शारदा चौधरी, मुलगा डॉ क्षितिज चौधरी, सून डॉ रिमा चौधरी, नातवंडे, मुलगी सौ राधिका, जावई उद्योजक राहुल चौधरी व नातवंडे आहेत.
डॉ. चौधरी यांनी गेल्या 50 वर्षांपासून श्री हॉस्पिटलच्या माध्यमातुन रुग्ण सेवा केली.
डॉ. चौधरी हे लेवा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते यासह बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे ते सिनेट सदस्य, महावीर सहकारी बँकेचे संचालक होते, विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता._
त्यांची अंतिमयात्रा दुपारी 3:30 वाजता राहते घर, प्रताप नगर येथून निघून जैन हिल्स, शिरसोली रोड येथे जाईल व तिथे अंतिम संस्कार होतील.