जळगांव – दि.११ ( धर्मसाथी न्यूज नेटवर्क) जळगाव शहरात रविवार दि.१० रोजी डॉ.स्वरा अभिषेक कोठारी यांच्या “स्वरा फिजिओकेअर” या फिजिओथेरपी केंद्राचा शुभारंभ थाटामाटात प्रमुख मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला. उद्घाटन सोहळा युनिटी चेंबर,गणेश कॉलनी, जळगाव येथे सकाळी १०.३० वाजता अत्यंत उत्साहात पार पडला. या अग्रगण्य फिजिओथेरपी केंद्राचा उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन जैन इरिगेशन चे अध्यक्ष मा. श्री. अशोकभाऊ जैन आणि प्रसिद्ध ऑन्कोसर्जन डॉ. निलेशजी चांडक यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच यावेळी एन.आय.एम.ए. जळगावच्या अध्यक्षा डॉ. माधुरीजी कासट, नेत्रचिकित्सक डॉ. अंकुरजी संचेती, भारत जैन महामंडळचे कोषाध्यक्ष सी.ए.अशोकजी पारख आणि डॉ. विल्सन ग्रुप चे अध्यक्ष श्री.लखीचन्द्जी जैन यांची विशेष उपस्थिती लाभली.
. या प्रसंगी श्री.अशोकभाऊ जैन व डॉ. निलेशजी चांडक यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना डॉ. स्वरा कोठारी या विविध हॉस्पिटलला भेट देऊन तेथील रुग्णांच्या दुखण्यावर त्यांना मार्गदर्शन करून उपचारसंदर्भात प्रभावी कार्य करत असतात.असेच रुग्णसेवेचे कार्य त्यांच्या हातून सदैव घडत राहो,आणि“स्वरा फिजिओकेअर” या फिजिओथेरपी केंद्राची चांगली प्रगती होवो अशा शुभेच्छा त्यांनी या प्रसंगी दिल्या.
डॉ. स्वरा अभिषेक कोठारी या कन्सल्टन्ट फिजिओथेरपिस्ट असुन बीपीटी,एमपीटी मस्कुलोस्केलेटल पिटीयामध्ये गोल्ड मेडलीस्ट आहेत.त्या ज्येष्ठ चार्टर्ड अकौंटंट सी.ए.अनिल कोठारी यांच्या स्नुषा तर सी.ए.अभिषेक कोठारी यांच्या सुविद्य पत्नी आहे. डॉ. स्वरा कोठारी यांनी आजपर्यंत मानदुखी, पाठदुखी, टाचांचे दुखणे, पॅरॅलिसीस झाल्यानंतरचे पुनर्वसन, स्कायटिका, जाईंन्ट रिप्लेसमेंट नंतर हाडांचे पुनर्वसन, हाड फ्रॅक्चर झाल्यानंतरचे हाडांचे पुनर्वसन, गुडघेदुखीवरील ईलाज तसेच संतुलित आहार व वजनावर नियंत्रण या अशा अनेक दुखण्यांवर उपचार केले आहेत आणि त्या उपचारांचा चांगला गुण रुग्णांना आलेला आहे.तरी संबधीत रुग्णांनी या नव्या वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वरा फिजिओकेअरच्या माध्यमातून करण्यात आले आहे.