जळगाव शहराच्या लाना विद्यालयात दिनांक एक मे रोजी संस्कारक्षम्य प्रेरणादायी गीतांचे संकलन असलेल्या गीतांजली या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा संस्थेचे प्रमुख एडवोकेट सुशील अत्रे यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते करण्यात आला.शालेय विद्यार्थ्यांना देशप्रेम वृद्धिंगत व्हावे व राष्ट्रीय भावना त्यांच्या मनात रुजावी या हेतूने निवृत्त प्राध्यापक शरदचंद्र छापेकर यांनी या लघु पुस्तिकांचे निर्माण केले या त्यांना नरसिंह सरस्वती प्रिंटिंग प्रेस चे सौजन्य लाभले. जळगाव शहरातील विविध परिसरातील शाळांना या पुस्तिका विद्यार्थ्यांसाठी भेटस्वरूपात मोफत वितरित केल्या जाणार आहेत.
श्री सांदीपनी विश्वस्त शिक्षण निधी या संस्थेच्या माध्यमातून हे प्रकाशन करण्यात आले तर कै. ल.नी छापेकर ह्यांच्या स्मरणार्थ हा क्षेक्षणिक उपक्रम राबवण्यात आला.
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी गीतांजली पुस्तकाचे ॲड.सुशील अत्रेंच्या हस्ते प्रकाशन
अधिक वाचलेल्या बातम्या