Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याआ. राजुमामा भोळे यांना एक लाख मतांनी विजयी करणार... ना.गिरीश...

आ. राजुमामा भोळे यांना एक लाख मतांनी विजयी करणार… ना.गिरीश महाजन

जळगांव शहर मतदार संघात १०९ कार्यकर्त्यांची जम्बो यादी : शिस्तबध्द गतिशील प्रचार नियोजन केले जाणार

जळगांव – दि.२५( धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगाव शहर विधान सभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपा महानगरची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी बोलावण्यात आली होती.या विशेष नियोजन बैठकीत व्यवस्थापन समितीच्या १०९ कार्यकर्त्यांना जबाबदारी सोपवण्यात येवून त्यांची जम्बो यादी जाहीर करण्यात आली.

या महत्वपूर्ण बैठकीत ग्रामविकास मंत्री श्री.गिरीश महाजन ,भाजपा जळगाव लोकसभा मतदार संघाचे प्रभारी खासदार बन्सीलाल गुर्जर यांनी कार्यकर्त्यांना दिशा दायक मार्गदर्शन केले.

याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे माजी महानगरप्रमुख दीपक सूर्यवंशी जळगाव लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख डॉक्टर राधेश्याम चौधरी शहर विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी सरचिटणीस अरविंद देशमुख महेश जोशी जितेंद्र मराठे ज्योती निंभोरे किशोर ढाके सुभाष सौचे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जिल्ह्यात महायुतीचाच प्रभाव….. ना.गिरीश महाजन.

विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय  जनता पक्षाने आजपर्यंत केलेल्या कामगिरीचा परतावा मतदार करतील यात कोणतीही शंका नाही जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्वच जागांवर महायुतीचेच उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने विजयी होतील जळगाव शहर मतदार संघातून आमदार सुरेश भोळे यांना एक लाखाचे मताधिक्य मिळून ते विजयी होतील असा विश्वास खासदार बन्सीलाल गुर्जर यांनी व्यक्त केला

यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने सहकार्य करावे व विक्रमी मताधिक्याने आपापल्या मतदारसंघ उमेदवारांना विजय करावे असे आवाहन श्री गिरीश महाजन यांनी  याप्रसंगी केले.

 

 

 

 

 

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या