जामनेर – ( प्रतिनिधी) केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ भंगाळे यांनी सभेला संबोधित करत असतांना भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजी नाना सोनार, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,यांना विश्वास व्यक्त करताना सांगितले की जामनेर तालुका केमिस्ट असोसिएशन पूर्णपणे ना .गिरीश भाऊंच्या पाठीशी आहोत व भाऊंना निवडून आणण्याची पूर्णपणे जबाबदारी आमची आहे असे आश्वासनही त्यांना दिले.
त्याप्रसंगी सभेमध्ये जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक आतीश झाल्टे, मा.गिरीश भाऊ यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे त्याचबरोबर जामनेर तालुक्यातील सर्व केमिस्ट परिवार देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते