जळगांव – श्री संत मुक्ताबाई यांचे ७२७ व्या अंर्तधान सोहळ्या निमित्त १ जून २०२४ दिनी सकाळी ९ वाजता श्री संत मुक्ताई पादुका मंदिर, शिवाजी उद्यानाजवळ मेहरूण येथे कीर्तन संपन्न झाले.
वैशाख वद्य दशमी दि.१ जून २०२४ शनीवार या शुभदिनी सकाळी ९ ते १२ या वेळेत साजरा करण्यात आला.
जळगावातील रामपेठेतील जलग्रामदैवत श्रीराम मंदिरात पहाटे ५ ते ७ या वेळेत श्री सदगुरू अप्पा महाराजांना मिळालेल्या प्रासादिक ब्रह्मचित्कला आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईच्या पादुकांवर श्रीराम मंदिराचे उत्तराधिकारी ह.भ.प.श्रीराम महाराज यांचे शुभ हस्ते महाअभिषेक करण्यात आला. (श्री संत मुक्ताई पालखी पंढरपूर आषाढी वारी प्रस्थान पत्रिका व यजमान मुक्काम टपाल पत्र पुजन झाले ).कीर्तन श्रवण व श्री संत मुक्ताई पादुका दर्शनासाठी मेहरूण,जुने जळगाव,वाल्मिक नगर,शिवाजी नगर,शाहू नगर,महाबळ कॉलनी,पिंप्राळा,हरि विठ्ठल नगर,तुकाराम वाडी,जानकि नगर,ईश्वर कॉलनी,गणेश कॉलनी, परिसरातील वारकरी भाविक उपस्थित होती.श्री शिवाजी उद्यानाजवळील श्री सदगुरू अप्पा महाराजांना श्री संत मुक्ताबाईचा दृष्टांत त्या पवित्र स्थळी श्री संत मुक्ताबाई पादुका मंदिर येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत ह.भ.प.श्रीधर महाराज जोशी यांच्या शुभहस्ते पुजन होऊन सकाळी ९ वाजता ह.भ.प.श्री. जयदेव महाराज गुरव (अमळनेर) यांचे श्री संत तुकाराम महाराजांच्या संताचिये पायी हा माझा विश्वास । या अभंगावर सुश्राव्य वारकरी कीर्तन सेवा झाली.पौरोहित्य श्री नंदू गुरुजी यांनी केले मृदुंग वादनाची साथ भरत महाराज पाटील, हार्मोनियम साथ निंबा पाटील, विणेकरी संभाजी पाटील,टाळकरी म्हणून श्रीराम मंदिर मेहरूण भजनी मंडळ, अशोक महाराज शिंपी, माऊली टेलर,बापू सोनार, रतन माळी,जानकिराम भोई इ.साथ केली कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजय लाडवंजारी,मनोजचंद्रात्रे,बाळू कोळी, कारभारी गव्हाणे,
वंशपरंपरेने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री संत मुक्ताबाई राम पालखीचे दि.२० जून २०२४ दुपारी ५ वा. श्रीराम मंदिरातून निघेल रात्री श्री अप्पा महाराज समाधीत मुक्काम व दि.२१ जून सकाळी ८ वा. ज्येष्ठ वट पौर्णिमेस पंढरीकडे पायी प्रस्थान होईल (यंदा पालखीचे १५२ वे वर्ष आहे.