जळगाव : येथून जवळच असलेल्या बांभोरी, ता.धरणगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. मंदिराचे संस्थापक अध्यक्ष हभप अण्णा महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तांनी आपापल्या परीने सेवा देत गुरुप्रति सद्भावना व्यक्त केली.
प्रारंभी सकाळी पादुकापूजन, श्रीशूल पूजन व संत गजानन महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक होऊन मूर्ती व फोटोला पुष्पार्पण करण्यात आले. तसेच श्री नर्मदेवर महादेव व त्रिशूल यांचा रुद्राभिषेक करण्यात आला.
पुरोहित गोविंद महाराज जोशी यांनी मंत्रोच्चारात पूजा केली. सकाळी दहाला रक्तदान शिबिर झाले. यात 10 जणांनी रक्तदान केले. यासाठी माधवराव गोळवलकर रक्तपेढीने सहकार्य केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय परिवहन व जलवायू मंत्रालय समिती सदस्य डॉ. एस. एन. पाटील, गोदावरी मेडिकल कॉलेजचे डीन डॉ.दिलीप ढेकळे, सेवानिवृत्त अभियंता नानाभाऊ बोरसे, कबचौ उमविचे कक्षाधिकारी रमेश पाटील, डॉ.राहुल चौधरी, माजी महापौर सीमा भोळे, योगगुरू सुनील गुरव, दीपक गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रक्तदान व वृक्षारोपण उपक्रमासाठी अनुष्का सेवाभावी संस्थेने सहकार्य केले. या मान्यवरांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत सिद्धेेश सुनील नेमाडे हा 100 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला याबद्दल त्याचाही सत्कार झाला.
याप्रसंगी भक्तमंडळींनी हभप अण्णा महाराजांचा गुरूसम व्यक्तिमत्व या शब्दसुमनांनी व शाल-श्रीफळ देवून गौरव केला. दहा ते बारापर्यंत भजने झाली. भजनांमध्ये सुनंदा पाटील, पुष्पा पाटील, चित्रा चैच्यानी, किरणबाई पाटील, सुशीलाबाई शिंदे, सुरेखा पाटील, शोभा बागुल, स्नेहा बडगुजर, शोभा सोनवणे, माया पाटील, शैला पाटील, कल्पना पाटील, मीना परदेशी, उज्ज्वला ठाकरे, कविता पवार, पल्लवी पाटील, शोभा कुलकर्णी, प्रीती पाटील, लक्ष्मीबाई पाटील, रंजना वाणी, मनीषा बडगुजर, मंदा तायडे यांनी सहभाग घेतला.
संगीतात वासुदेव पाटील, ज्ञानेश्वर ठाकरे, विठ्ठलसिंग मोरे, रमेश तायडे, मधुकर माळी, बापू पाटील, बळीराम पाटील यांनी भाग घेऊन सुंदर भजने सादर केली. अनुष्का सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी महापौर सीमा भोळे व सुषमा सोमवंशी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. भंडाऱ्यात वरण-बट्टी, वांग्याची भाजी, मोतीचूर लाडूचा हजारावर भाविकांनी लाभ घेतला.
जी. एम. पाटील, अतुल पाटील, भूषण पाटील, केदार पाटील, के. एस. पाटील, दीपक पाटील, दीपक चौधरी, विजय पाटील, जयंत पाटील, देवा सोनवणे, गोपाल पाटील, कमलाकर फडणीस, डी.जी. सूर्यवंशी, सुरेश सोनवणे, एन.व्ही. पाटील यांनी सहकार्य केले, असे बांभोरी येथील श्री संत गजानन महाराज मंदिराचे संस्थापक अध्यक्ष हभप अण्णा महाराज पाटील यांनी कळविले आहे.