जळगांव – (प्रतिनिधी) ब्रह्मश्री परिवारातर्फे समर्थ रामदास मंदिर, महाबळ कॉलनी येथे आज गीता जयंती निमित्त गीतापुजन व मार्गदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात मोठ्या संख्येने संपन्न झाला.
यावेळी गीतेतील 12 व्या अध्यायाचे सामूहिक पठण करण्यात आले. त्यानंतर गीतेची आरती व पूजन केले गेले.
याप्रसंगी बहुसंख्य समाज बांधवांची व महिलांची उपस्थिती होती. यात ज्येष्ठांनी श्रीकृष्ण भगवंताच्या दिव्य कार्याची महिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली.तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढील पिढीला या विषयाचा बोध व्हावा यासाठी आयोजन असल्याची माहिती या प्रसंगी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक वाघ, डॉ.निलेश राव, सुनिल कुलकर्णी, संजय दीक्षित, कमलाकर फडणीस, महेंद्र जोशी, प्रदीप जोशी, सिद्धार्थ फडणीस यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमानंतर सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला.