Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeआध्यत्मिकश्री संत मुक्ताबाई यांचे ७२७ व्या पुण्यतिथी निमित्त १ जून २०२४ दिनी...

श्री संत मुक्ताबाई यांचे ७२७ व्या पुण्यतिथी निमित्त १ जून २०२४ दिनी सकाळी ९ वाजता श्री संत मुक्ताई पादुका मंदिर, शिवाजी उद्यानाजवळ मेहरूण येथे किर्तन

जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान येथे संस्थानचे वतीने श्री संत मुक्ताबाईंची ७२७ वी पुण्यतिथी
वैशाख वद्य दशमी दि.१ जून २०२४ शनीवार या शुभदिनी सकाळी ९ ते १२ या वेळेत साजरी करण्यात येणार आहे.

जळगावातील रामपेठेतील जलग्रामदैवत श्रीराम मंदिरात पहाटे ५ ते ७ या वेळेत श्री सदगुरू अप्पा महाराजांना मिळालेल्या प्रासादिक ब्रह्मचित्कला आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईच्या पादुकांवर महाअभिषेक करण्यात येईल. या प्रसंगी श्री संत मुक्ताई पालखी पंढरपूर आषाढी वारी प्रस्थान पत्रिका व यजमान मुक्काम टपाल पत्र पुजन होईल. मेहरूण परिसरातील श्री शिवाजी उद्यानाजवळील श्री सदगुरू अप्पा महाराजांना श्री संत मुक्ताबाईचा दृष्टांत त्या पवित्र स्थळी श्री संत मुक्ताबाई पादुका मंदिर येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत संस्थानचे विद्यमान पंचम गादीपती व श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प.श्री. मंगेश महाराज जोशी यांच्या शुभहस्ते पुजन होऊन सकाळी ९ वाजता ह.भ.प.श्री. जयदेव महाराज गुरव (अमळनेर) यांची सुश्राव्य वारकरी कीर्तन सेवा होईल. तरी भाविकांनी मेहरूण शिवारातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळील श्री संत मुक्ताबाई मंदिरात येऊन कीर्तन श्रवणाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन संस्थानने केले आहे.
कडाडली वीज निरंजनी जेव्हा। मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली। श्री संत नामदेव महाराज

मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ । सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती । श्री संत एकनाथ महाराज

वंशपरंपरेने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री संत मुक्ताबाई राम पालखीचे दि.२० जून २०२४ दुपारी ५ वा. श्रीराम मंदिरातून निघेल रात्री श्री अप्पा महाराज समाधीत मुक्काम व दि.२१ जून सकाळी ८ वा. ज्येष्ठ वट पौर्णिमेस पंढरीकडे पायी प्रस्थान होईल यंदा पालखीचे १५२ वे वर्ष आहे

धन्य धन्य मुक्ताबाई। तुमचे चरणी माझे डोई ।। श्री संत चांगदेव महाराज

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या