Monday, December 23, 2024
Google search engine
Homeआध्यत्मिकमासिक श्रीप्रसाद चे संपादक हेमंत जोशी यांचे निधन

मासिक श्रीप्रसाद चे संपादक हेमंत जोशी यांचे निधन


  • जळगांव – श्री गजानन महाराज यांच्या भक्त परिवारात श्रींच्या लीलांची अनुभूती देणाऱ्या अध्यत्मिक व धार्मिक लिखाणाने समृध्द , अल्पावधीत लोकप्रिय  झालेल्या श्रीप्रसाद  मासिकाचे  संपादक व विहीप चे जुने सक्रिय कार्यकर्ते हेमंत दत्तात्रय जोशी यांचे दि.27 मे  रात्री 9.30 वाजता निधन झाले.
  • गेल्या महिन्याभरापासून ते वैद्यकीय उपचार घेत होते.मात्र सुधारणा होवू शकली नाही. मूळचे चाळीसगाव येथील रहिवासी असलेले हेमंत जोशी यांना सामाजिक  व धार्मिक क्षेत्रात सेवा कार्य करण्यात गोडी होती .ते युवा वयापासूनच विविध सामाजिक व धार्मिक संस्थांमध्ये कार्य  करत होते
  • विश्व हिंदू परिषदेच्या जळगाव जिल्ह्यातील कार्यात ते संघटन कौशल्याने परिचित होते विविध आंदोलन यात ते सहभागी असतं.मासिक गणानामत्वां यांचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रभावी कार्य केले.मात्र त्यांनी त्यानंतर स्वतः च्या श्री प्रसाद मासिकाचे कार्य सुरू केले . व सम्पूर्ण जिल्हाभर व इतर  जिल्ह्यात काही ठिकाणी हजारो सभासद नोंदणी करून श्री गजानन महाराज यांच्या विचार कार्याचा प्रचार  प्रसार करीत धार्मिक मासिक क्षेत्रात ठसा उमटवला. मासिकातील वाचकांचे  व श्री भक्तांचे स्व अनुभव वैशिष्ठ्यपूर्ण स्वरूपात छायाचित्रासह ते प्रसिद्ध करत होते. त्यातील धार्मिक माहिती देणारे लेख आवडीने वाचले जात होते.त्यांनी श्री भक्तांना एक सक्षम व्यासपीठ या धार्मिक चळवळीतून उपलब्ध करून दिले होते व त्यांच्या परिवाराने या कार्यात समर्पित होवून त्यांना साथ दिली .

श्रींच्या कार्याची महती पटवून देणारे त्यांचे प्रवचन कार्यक्रम  गजानन महाराज भक्त परिवारात विविध ठिकाणी आयोजित केले जात असत त्यांच्या ओजस्वी वाणीतून भक्त मंत्रमुग्ध होत असत.श्रींचा प्रगट दिनाचा कार्यक्रम दरवर्षी ते उत्साहपूर्ण वातावरणातसाजरे करीत असता. भजन ,श्रींचे भक्तिगीते व्याख्यान, प्रवचन अश्या  कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करूनअनेक मान्यवरांना ते त्या कार्यक्रमात आमंत्रित करून त्यांची अध्यात्मिक गोडी ते वाढवीत असतं.त्यांनी विविध क्षेत्रातील व्यक्तींना या कार्यात जोडले होते.जळगाव येथील बळीराम पेठ व नंतर प्रल्हाद नगर येथील निवासस्थानी त्यांनी  श्रींच्या दरबारात दर गुरुवारी सत्संग कार्यक्रम सुरू केला होता.त्याला देखील श्रीभक्तांचा मोठा प्रतिसाद लाभत असे. श्री प्रसाद मासिकाच्या वार्षिक कार्यक्रमात ते नामवंत व्यक्तींना आमंत्रित करून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ श्री भक्तांना करून देत असत.   फार मोठीआर्थिक सक्षमता नसतांना केवळ परिश्रम पूर्वक वाटचालीतून  श्रींच्या कृपा आशिर्वाद पाठीशी असल्याने जिद्दीने व सकारात्मक दृष्टीने  निस्वार्थी सेवा कार्य करणाऱ्या श्री हेमंत जोशी यांच्या निधनाने श्री  गजानन महाराज भक्त परिवारात शोककळा पसरली आहे. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा मुलगी सून, जावई नातवंड असा मोठा परिवार आहे.त्यांची अंत्य यात्रा दि.28 मे रोजी प्रल्हाद नगर पिंप्राळा येथून सकाळी निघणार आहे.मीराबाई नगर येथील स्मशान भूमीत अंत्य संस्कार केलं जाणार आहे..

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या