जळगाव — येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये दि १४ मे ते १८ दरम्यान विषय विभागनिय ऑनलाईन वेबिनार मालीकेचे आयोजन करण्यात आले होते. या मालिकेतील मार्गदर्शनामूळे प्राध्यापक व विदयार्थ्याच्या ज्ञानात भर पडून लाभ झाला.
विविध विषयाच्या विभागातर्फे आयोजित या मालिकेत दि १४ रोजी कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागातर्फे आरोग्यासाठी समुदायांचे सक्षमीकरण, वृद्धत्व: समुदाय सेटिंगमध्ये जेरोन्टोलॉजिकल नर्सिंग या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी एलिझाबेथ रॉड्रीक्स प्राचार्य कॉलेज ऑफ नर्सिंग मुबंई, दि १५ मे रोजी बाल आरोग्य नर्सिंगतर्फे मुलांमधील कुपोषण व भारतातील परिचारीकांसाठी धोरणे या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. मिनी राणी मेरीबेथ व्याख्याता, किंग फैसल विद्यापीठ, अल अहसा, राज्य सौदी अरेबिया,दि. १६ मे रोजी प्रसुती आणि स्त्रीरोग विभागातर्फे अंडी साठवण व त्यांचे संरक्षणवर डॉ सफाबी देवी एन. प्राचार्य, दानेशोरी कॉलेज ऑफ नर्सिंग, संभाजी नगर दि १७ मे रोजी मानसिक आरोग्य नर्सिंग विभागातर्फेे मानसिक आरोग्य उपचारासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान विषयावर डॉ.मोनिता ठोकचोम नर्सिंग कॉलेज, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी, पुणे. दि १८ मे रोजी समारोप मेडीकल सर्जिकल नर्सिंग विभागातर्फे आयोजित हायपोप्निया आणि स्ट्रोक रोखण्यात त्याची भूमिका एल्बी के पॉल प्राध्यापक, चिरायू कॉलेज नर्सिंग, भोपाळ यांनी केला. विविध विषयांच्या ऑनलाईन वेबिनार मालिकेतून प्राध्यापक व विदयार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली असून आगामी काळातही अशा वेबिनार मालिका सतत सुरू राहणार असल्याचा मानस प्राचार्य विशाखा गणविर यांनी व्यक्त केला.
ऑनलाईन विषय विभागनीय वेबिनार मालिकेचे आयोजन प्राध्यापक व विदयार्थ्याना झाला लाभ,
अधिक वाचलेल्या बातम्या