जळगांव – दि.१ (धर्म साथी मीडिया नेटवर्क )शहरापासून जवळ असलेल्या झुरखेडा निमखेडा तालुका धरणगाव येथे २६ ते ३० डिसेंबर दरम्यान भव्य स्वरुपात आयोजित करण्यात आलेल्या परमपूज्य पंडित श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी महाराज(पूज्य बागेश्र्वर धाम सरकार यांच्या श्री मुखातून भाविकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या कथेचे आयोजन उत्साही स्वरूपात करण्यात आले आहे.त्या भव्य आयोजनात बैठकीत केमिस्ट संघटनेचे खंबीर नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांना आमंत्रित करण्यात आले होते.त्या साठी दी.१ रोजी झुरखेडा येथे भेट देत जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून संभाव्य नियोजनात सहभागी होत समिती सदस्यांना भव्य नियोजन यशस्वी होण्यासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.तसेच या भव्य आयोजनात केमिस्ट परीवाराचे सहकार्य आरोग्य सेवेतून पाठीशी असेल याची ग्वाही दिली.
याप्रसंगी आयोजनात सहभागी उद्योजक श्री.सुनील झवर, त्रिमूर्ती फार्मसी कॉलेजचे संचालक श्री. मनोज पाटील ,श्री , कासट, स्वरूप लुंकड, श्री राजू भाऊ बांगर, अनिल पाटील,डॉ.स्नेहल फेगडे, राजेश यावलकर, श्री.पियूष रावळ, यांचेसह अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.