Monday, December 23, 2024
Google search engine
Homeराजकारणनवी पेठ गणेश मंडळ व ललवाणी परिवारातर्फे भाजपा प्रचारफेरी चे स्वागत

नवी पेठ गणेश मंडळ व ललवाणी परिवारातर्फे भाजपा प्रचारफेरी चे स्वागत


भाजपा लोकसभा महायुतीच्या उमेदवार श्रीमती स्मिता ताई वाघ यांच्या जळगाव शहर प्रचार अभियानात दि.८ मे रोजी दुपारी गोलाणी हनुमान मंदिरापासून प्रारंभ झाला भारतीय जनता युवा मोर्चा सह मंडळ क्रमांक २ प्रभाग क्रमांक ५ च्या वतीने शेकडो कार्यकर्ते , महिला पदाधिकारी,सदस्य भाजप आमदार राजू मामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले होते.
जयकिसान वाडी , नेहरू चौक, बॉम्बे लॉज,नवी पेठ सर्व गल्ल्या,असा प्रवास करीत ही प्रचार फेरी नवी पेठ भारत डेअरी जवळ पोहचली ,रहिवासी नागरिक तसेच नवी पेठ गणेश मंडळातर्फे मनिशभाऊ झवर व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत याप्रचार रॅली चे केले. ,तसेच महावीर ज्वेलर्स ललवाणी परिवाराने जोरदार स्वागत केले.तसेच प्रचार फेरीत सहभागी कार्यकर्त्यांसाठी शीतल जल व सरबत वाटप या प्रसंगी त्यांच्यावतीने केले.आ.राजूमामा भोळे यांनी त्यांच्या कार्यालयात भेट दिली.तेथे ललवाणी परिवारातर्फे त्यांचा सत्कार निलेश ललवाणी यांनी केला.त्यानंतर नवजीवन सुपरशॉप मार्गे दिव्य मराठी कार्यालय गल्ली तेथून श्री इच्छापूर्ती गणपती मंदिरातर्फे शामभाऊ कोगटा यांनी स्वागत केले .आ भोळे यांनी श्री गणेशाचे दर्शन घेवून मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळावा यासाठी प्रार्थना केली.तेथेच ह्या प्रचार फेरी चा समारोप करण्यात आला.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या