Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याभगिनीने सांगितली कानात विजयाची गोष्ट ; व्यापारी, भाजी विक्रेत्यांनी केला निर्धार, पुन्हा...

भगिनीने सांगितली कानात विजयाची गोष्ट ; व्यापारी, भाजी विक्रेत्यांनी केला निर्धार, पुन्हा एकदा राजूमामाच आमदार..!

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आ.भोळे यांना रॅलीत उदंड प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव येथे शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना व्यापारी,भाजी विक्रेते, घाऊक विक्रेते यांनी, ‘तुमच्या पाठीशी असून पुन्हा एकदा आपणच निवडून याल’ अशी विजयाची खात्री आ. राजूमामा भोळे यांना दिली.

प्रचार रॅलीत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पूर्ण परिसर आ. राजूमामा भोळे यांनी पिंजून काढला. रॅलीत सर्व व्यापारी वर्ग यांनी पुष्पहार घालून मिठाई भरवत आ. राजूमामा भोळे यांचे बाजार समितीमध्ये भरभरून स्वागत केले. प्रसंगी महायुतीच्या विविध घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीत आमदार राजूमामा भोळे यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. यावेळी एका महिला भगिनीने आ. राजूमामा भोळे यांना कानात विजयाची गोष्ट सांगून आश्वस्त केले.

रॅलीमध्ये मंडळ क्रमांक ८ चे अध्यक्ष महादू सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, माजी नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, विनोद मराठे, संजय महाजन, अशोक राठी, हेमंत नेमाडे, भरत कर्डिले, भूषण लाडवंजारी, दिलीप लाडवंजारी, नितीन गायकवाड, अशोक कोष्टी, महेश पाटील, शिवसेनेचे कुंदन काळे, हर्षल मावळे, शोभाताई चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विनोद देशमुख, अर्चना कदम, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, आनंदा सपकाळे, पिरीप पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, आरपीआय आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या