जळगांव – भाजपा जिल्हा महानगर तर्फे श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर गोलाणी मार्केट येथे आज संध्याकाळी 6 वाजता आ सुरेश भोळे राजू मामा यांच्या हस्ते महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे या साठी महाआरती करण्यात आली.
प्रभू श्रीरामाचा व श्री हनुमंताचा जयघोष कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाला भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष सौ उज्वलाताई बेंडाळे सरचिटणीस डॉ राधेश्याम चौधरी ,अमित भाटिया , माजी अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, तसेच जिल्हा पदाधिकारी मंडळ अध्यक्ष नगरसेवक महिला अध्यक्ष, युवा मोर्चा व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.