पारोळा – पारोळानगरी आपल्या विविध ऐतिहासिक ,धार्मिक वारसा वैशिष्ट्यांनी आगळीवेगळी ओळख जपणारे गाव म्हणून जिल्ह्यात या नगरीची ख्याती आहे.यात श्री पिले यांच्या पांडुरंग मंदिराचा देखील त्याप्रकरच्या वैशिष्ट्यपूर्ण जुने देवस्थान म्हणून समावेश आहे.आज आषाढी एकादशी निमित्त थोडक्यात या धार्मिक स्थाना विषयीमाहिती करून घेवू या.
सुमारे 250 वर्षाचा वैभवशाली धार्मिक इतिहासाचा ,संस्कारांचा वारसा या मंदिराच्या माध्यमातून हा स्थांमहिमा स्वरूपात जोपासला जात आहे.शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले हे धार्मिक स्थान भाविक भक्तांना ऊर्जा देत आहे.प्रत्येक भक्त व त्याचा परिवार या स्थानाशी अनेक वर्षापासून जोडला गेला आहे.
पिले घराण्याचे मूळ पुरुष श्री पांडुरंग बुवा कुलकर्णी अंमळनेरकर मूळ श्री सखाराम महाराजांचे समकालीन किंवा तत्पूर्वीचे संत होते. श्री पांडुरंग बुवांनी आपल्या अंतकाळी आपल्या जवळील देवांच्या मुर्त्या श्री दामोदर बुवा पिले यांच्या स्वाधीन केल्या व आपला देह ठेवला. हे पांडुरंग बुवांचे मंदिर श्री पांडुरंग मंदिर म्हणून प्रचलित झाले.
त्यानंतर इसवी सन १८२५ मध्ये श्री दामोदर बुवा पिले यांनी श्री पांडुरंग मंदिराचा जिर्णोद्धार करून पांडुरंगाची सेवा अखंडितपणे सुरू ठेवली. पुढे गोविंद बुवा पिले यांनी श्री पांडुरंग मंदिराचा मंदिराचा कारभार सांभाळला.
त्यानंतर अनंत बुवा पिले यांनी १८१८ पासून मंदिराचा कार्यभार सांभाळला पारोळा येथे माध्यमिक शिक्षण घेऊन पुढे १९१७ मध्ये आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थे मध्ये प्रथम विद्यार्थी म्हणून प्रवेश घेऊन वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांच्याबरोबर महाराष्ट्रभर कीर्तनासाठी दौरा केला.
त्यानंतर अनंतबुवांचे चिरंजीव श्री रमेश पिले यांनी १९४४ पासून मंदिराचे कार्यक्रम सुरू केले त्यांनी संस्कार पाठशाळा, संस्कृत पाठशाळा सुरू केली. मंदिरात दर शनिवारी व रविवारी दुपारी चार वाजता संस्कार पाठशाळा दर एकादशीस वारकरी भजन कीर्तन संतांच्या पुण्यतिथी जयंती उत्सव साजरी केले जातात.
उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ एप्रिल ते १५ जून पर्यंत दररोज सायंकाळी पाच ते सहा वासंतीका अभ्यास वर्ग घेतला जातो . दिवाळीच्या सुट्टीत शारदीय अभ्यास वर्ग विनामूल्य घेतला जातो. या वर्गात विविध स्तोत्रपठण देशभक्तीपर गीते योग शिबिर पंचतंत्र कथा भजन प्रवचन इत्यादी शिकवल्या जातात. आता मंदिरात पिले घराण्याची सातवी पिढी श्री संजय पिले व दीपक पिले व त्यांचे चिरंजीव हिमांशू आदित्य मंदिर व हा धार्मिक व सांस्कृतिक तसेच संस्कारांचा वारसा जपत आहेत.