जळगांव – माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यात आले. भाजपा जळगाव महानगरच्या वतीने जिल्हा कार्यालय जीएम फाउंडेशन येथे राजूमामा भोळे,श्रीमती स्मिताताई वाघ, जिल्हाध्यक्ष सौ उज्वला ताई बेंडाळे यांच्या हस्ते “प्रतिमापूजन व माल्यार्पण” करण्यात आले.
या प्रसंगी राजेंद्र घुगे पाटील, सुनील भाऊ खडके, आबा कापसे, उदय भालेराव, जिल्हा सरचिटणीस महेश जोशी, अरविंद भाऊ देशमुख, दीपक भाऊ सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, प्रकाश भाई बालानी, अमित काळे, अशोक राठी, पंकज जैन, संजय लुल्ला, प्रकाश पंडित, योगेश पाटील, विनोद मराठे, मिलिंद चौधरी, ललित बडगुजर, अमित देशपांडे, स्वप्नील साकळीकर, चंद्रकांत शिंदे, किरण भामरे, दीपक कोळी ,गजानन वंजारी, स्वप्निल चौधरी हितेश राजपूत आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
संघर्षशील, लढाऊ व्यक्तिमत्व, जनसामान्यांचा असामान्य आवाज, मराठवाड्याचे खंबीर नेतृत्व, स्पष्टवक्ते राजकारणी, महाराष्ट्राचे अद्वितीय लोकनेते, महाराष्ट्रावर जिवापाड प्रेम करणारे, स्व. गोपीनाथराव मुंडे यांना स्मृतिदिनानिमित्त मनपूर्वक विनम्र अभिवादन
या प्रसंगी करण्यात आले..