भुसावळ- शहरातल्या गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढत बुधवारी रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास
महामार्गालगत नवीन सातारा परिसरात पुलाजवळ जळगाव नाका लगत मरिमाता मंदिरा नजिक जुन्या वैमनस्यातून वाहनात बसलेल्या माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ता सुनिल राखुंडे या दोघांवर अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळ्या झाडत त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडल्याने शहर हादरले आहे.जुन्या वादातून ही घटना घडली असल्याचे समजते.
पुन्हा एकदा गँगवार भडकले असल्याने ही गंभीर घटना घडल्याने पोलिस खात्या समोर आव्हान उभे ठाकले आहे.
पोलिस घटनास्थळी पोहचले असून त्यांना तात्काळ उपचार करण्या दृष्टीने भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले.मयातांच्या नातेवाइकांची मोठी गर्दी पहावयास मिळत होती.
वरील घटनेची माहिती समजताच सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. व शहरात या घटनेमुळे तणावाची परिस्थिती लक्षात घेवून कुठेही अनुचित घटना घडू नये या साठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन पडघन व त्यांची टीम हल्लेखोरांचा मागोवा घेवून त्यांची माहिती संकलित करत आहे.हल्लेखोरांना लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना रवाना करण्यात आले आहे
या गोळीबाराच्या घटनेत मयत झालेल्या दोघांना शव विश्चेदन करण्यासाठी जळगाव येथील शासकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आले आहे.