जळगांव – दि.१९ (प्रतिनिधी) जळगांव विधानसभा निवडणूक प्रचार मर्यादा संपत असताना शेवटच्या दिवशी पहाटे तांबापुऱ्यातील शेरा चौकात रहिवास असलेल्या अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना सुमारे ४ वाजेच्या सुमारास घडली.यघटनेत २ राऊंड बंदुकीतून अज्ञात्यानी झाडले आहेत.घटना समजताच जळगाव येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी व पथक तात्काळ घटना स्थळी दाखला झाले.घटनेचा खोलवर तपास केला जात आहे.जिल्हाभरात उमेदवारांवर गोळीबाराची ही दुसरी घटना आहे.
अहमद हुसेन शेख (वय ५०)असे या अपक्ष उमेदवाराचे नाव असून ते शेरा चौकात रहिवास करतात ते यापूर्वी एम आय एम यपक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत होते.व्यवसायाने शिक्षक असलेले शेख व त्यांचा परिवार हे पहाटेच्या गाढ झोपेत असताना अज्ञात २ मोटर सायकल धारकांनी घरासमोर येवून वरच्या मजल्यावरील घराच्या बाहेरील खिडक्यांच्या काचावर २ राऊंड फायर केले.त्यात काचा फुटल्याचा आवाज आल्याने कुटुंबीय खडबडून जागे झाले.त्वरित त्यांनी पोलिस स्टेशनला घटनेबाबत माहिती कळवली.घटना घडल्याचे परिसरात समजताच रहिवाशांची घरासमोर गर्दी जमा झाली.
पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, डि.वाय.एस.पी.संदीप गावित यांनी घटनास्थळी भेट देत तात्काळ तपासाला गती देण्यासाठी सूचना दिल्या.त्यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस पथक घटनेचे सूत्रधार यांचा शोध घेत आहे.त्यादृष्टीने कॅमेरा फुटेज मध्ये गोळीबाराची घटना घडवणाऱ्या अज्ञात हे कैद झाले आहेत. तपास त्वरित व गतीने त्या आधारावर केला जात आहे.
अपक्ष उमेदवार अहमद शेख यांनी बोलताना सांगितले की आपण आपल्या प्रचारात व्यस्त होतो व मतदार संघाच्या विकासा संदर्भातच मी प्रचार केला आहे.पण या अकस्मात घटने बाबत मी निश्चित काही सांगू शकत नाही.मात्र विचलित न होता प्रचाराचे कार्य पूर्ण करेल.