जळगाव- दि.१० ( धर्म साथी न्यूज नेटवर्क) जळगाव शहरात सर्वत्र नवरात्र उत्सवपर्व सुरू असताना पंचमुखी हनुमान मंदिराच्या मागील बाजूस रणछोड नगरात्त ५७ वर्षीय महिलेची निर्घृण हत्त्या राहत्या घरात करण्यात आल्याची घटना दि.१० रोजी ८.३० च्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली.भरवस्तीत महिलेच्या डोक्यात काहीतरी वस्तूने वार करण्यात आल्याचे निदर्शनास आले असून हा खून असल्याचा कयास आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोहचले असून ह्या घटनेचा पुढील तपास करत आहेत.मात्र या घटनेने शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्ना गंभीर झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरामागील बाजूस असलेल्या रणछोड नगर परिसरात राहणारे राजेश नवाल यांचे दाणाबाजारात धान्याचे दुकान आहे. गुरुवारी ते नेहमी प्रमाणे दुकानावर गेलेले होते. सायंकाळच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या भावाची पत्नी देखील मंदिरात गेलेली होती.राजेश नवाल यांच्या पत्नी सुवर्णा नवाल (वय-५७)या घरी एकट्याच होत्या.
रात्री ९ वाजेच्या सुमारास राजेश नवाल हे दुकानातून घरी आले असता घरात त्यांच्या पत्नी सुवर्णा या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्यांना दिसल्या. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, एमआयडीसी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पोलीस पथक पोहचले असून ते अधिक तपास करत आहेत
मयत सुवर्णा नवाल यांच्या पश्चात २ मुली आणि १ मुलगा असा परिवार आहे. एक मुलगी विवाहित असून मुलगा आणि मुलगी नोकरीनिमित्त पुणे, मुंबई येथे असतात. घटना नेमकी कोणत्या कारणाने घडली हे अद्याप समजू शकले नसून पुढील तपास वेगाने सुरू आहे.