जळगांव – दि.४ (प्रतिनिधी) जळगांव शहर विधानसभा निवडणुकीसाठी आज दि.४ रोजी माघारी च्या दिवशी मुदत संपत असताना राजकीय क्षेत्रात अनेक वर्षापासून कार्यरत सालार परिवारातील सदस्य अपक्ष उमेदवार अब्दुल अजीज सालार यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
या प्रसंगी तहसील कार्यालयातून अर्ज मागे घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी सांगितले की
कोणत्याही दबावाला आपण बळी पडलेलो नाही ,माझी निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण केली होती.व जिंकण्याचा आत्मविश्वास देखील मला होता मात्र वरिष्ठांच्या आदेशाने निवडणूक न लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे.
ही निवडणूक राज्य पातळीवरील मुद्द्यांवर लढली जात असल्याने आपल्या स्थानिक मुद्द्यांबाबत मार्गदर्शक वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत असल्याचे त्यांनी सांगितले या निवडणुकी साठी कोणाला पाठिंबा देणार त्या बाबत अजून निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.