Sunday, December 22, 2024
Google search engine
HomeBlogदेशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघातर्फे कोजागिरी उत्साहात

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघातर्फे कोजागिरी उत्साहात

जळगाव : देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघातर्फे भोईटे नगर येथे विलास देशमुख यांच्या निवासस्थानी अतिशय उत्साहात कोजागिरी पौर्णिमा साजरी झाली.

गुरूंना आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान असते. त्यांच्या विचाराच्या वाटेने चालल्यास जीवनाचा मार्ग सहजतेने तरला जातो. निरुपणासाठी कीर्तनकार रश्मी कुरंभट्टी यांनी श्री गुरूचे चरणकंज हृदयी स्मरावे, हा समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग घेतला होता. त्यांचा सत्कार स्वप्नगंधा जोशी यांनी केला.

सुरुवातीला देशस्थ ऋग्वेदी मध्यवर्ती संघाचे कार्यवाह गणेश वडवेकर यांनी मध्यवर्तीच्या कार्याची माहिती दिली. त्यांचा सत्कार विवेक काटदरे यांनी केला. त्यानंतर सुरेश झारे यांनी कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व विषद केले. नंदू नागराज यांनी कविता सादर केली.

उत्स्फूर्त कला सादरीकरणात एका चिमुरडीने सुंदर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पाच मिनिटात चित्र काढले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उदय खेडकर, अजिंक्य कुळकर्णी, सिध्दांत फडणीस यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन विशाखा देशमुख यांनी केले.कार्यक्रमाला ब्रह्मश्री मंडळाचे अध्यक्ष कमलाकर फडणीस, बहुभाषिक संघाचे अध्यक्ष नितीन पारगावकर, ऍड. सुहास जोशी, नितीन मटकरी, डॉ.आनंद कुलकर्णी, दत्तात्रय गंधे, जितेंद्र शिरवळकर, दिनकर जेऊरकर, शामसुंदर कलभांडे, धनंजय राव, आनंद दशपुत्रे यासह अनेकांची उपस्थित होती.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या