जळगांव – दि. २३ ( धर्मसाथी मीडिया नेटवर्क) ब्राह्मण सभा महिला समितीतर्फे दिनांक २३ ऑक्टोबर मंगळवार रोजी कोजागिरीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दीप प्रज्वलन धरणगाव येथील प्राध्यापिका सौ रोहिणी अग्निहोत्री, अनिता फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका अनिता नांदेडकर, वैदेही नाखरे आणि श्रद्धा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला समिती प्रमुख वैदही नाखरे यांनी केले.
यावेळी प्राध्यापक रोहिणी कुलकर्णी यांचे कथाकथन, महिलांशी संवाद तसंच सौ अनिता नांदेडकर यांनी महिलांना व्यवसाय विषयक मार्गदर्शन केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. मृदुला कुळकर्णी ह्यांनी करून दिला तसंच कार्यक्रमात चंद्र गीते सरप्राईज प्रश्न, उखाणे आणि भरपूर मनोरंजनाचा समावेश होता. तसंच या कार्यक्रमात महालक्ष्मी आराम स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत
सौ दीपा देशपांडे प्रथम क्रमांक सौ अर्चना मुळे द्वितीय सौ सुवर्णा कुलकर्णी तृतीय सौ स्मिता सारे उत्तेजनार्थ स्पर्धेचे परीक्षण अनिता नांदेडकर ह्यांनी केले.तसंच ह्या स्पर्धेत अनेक महिलांना सरप्राईज बक्षीस ही देण्यात आली.
 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेवती कुरंभट्टी, मीनाताई जोशी, वृषाली व्यवहारे, स्वप्नगंधा जोशी, ह्यांचे सहकार्य मिळाले.आभार प्रदर्शन कार्यकारणी सदस्य श्रद्धा कुळकर्णी ह्यांनी केले. कार्यक्रमानंतर महिलांनी अल्पोपहार आणि दुधाचा आस्वाद घेतला.ह्या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला.