जळगांव – शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सौ. सु. ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये ई.१ली. ते ई.४थी मधील विध्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० [ NEP 2020 ] अनुसरून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व गणित क्षेत्रातील आवड निर्माण करण्यासाठी STEM उपक्रम Eruxbot तर्फे मुलांचा बौद्धिक विकासासाठी खेळाच्या माध्यमातून शिकण्याचे महत्त्व सांगितले.छोटा सायंटिस्ट हा उपक्रम सुरू करण्यात आला.
या प्रसंगी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ व मिलिंद महाविद्यालय छ. संभाजीनगर आणि दीपस्तंभ सांस्कृतिक संघ सांगली या तीनीही संस्थाच्या वतीने दुबई येथे ४ थे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा बापू साळुंखे यांना घोषित करण्यात आलेला आहे. संस्थेचे सर्व पदधिकारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे तर्फे अभिनंदन करण्यात आले.