जळगाव – येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौ.सु .ग. देवकर प्रायमरी स्कूलमध्ये “विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक “या विषयावर परिवहन समितीची सभा संपन्न झाली.यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
सदर सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुषमा साळुंखे होत्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शहर वाहतूक पोलीस शाखा सहाय्यक सौ. मेघना जोशी वीर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष श्री. दिलीपभाऊ सपकाळे ,माजी नगरसेविका सौ मंगलाताई चौधरी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. चंद्रकात शिंदे आणि शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. सुनिता चौधरी यांची विशेष उपस्थिती होती.
प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित रिक्षा चालक मालक बंधूना सुरक्षित वाहतूक विद्यार्थ्यांची काळजी कशी घ्यावी गाडीची कागदपत्र गाडीचा मेटनन्स, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, वाहतूक नियमांचे पालन या विषयांवर मार्गदर्शन केले.
सभेचे सुत्रसंचलन श्री. जितेंद्र वानखेडे तर आभार श्री अजय भिरुड यांनी मानले.