जळगांव – युवा विकास फाऊंडेशन संचलित, सीताबाई गणपत भंगाळे माध्यमिक विद्यालयव प्राथमिक विद्यालय आणि बालक मंदिर येथे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना(उ.बा.ठा.)पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.
युवा विकास फाऊंडेशन संचलित, सीताबाई गणपत भंगाळे माध्यमिक विद्यालय, प्राथमिक विद्यालय आणि बालक मंदिर येथेशिवसेना(उ.बा.ठा.) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्तशिवसेना(उ.बा.ठा.) जिल्हा प्रमुख जळगाव मा. विष्णू भाऊ भंगाळे,यांच्या अध्यक्षतेखाली परिसरातील नागरिक लक्ष्मण धांडे सर ,इंगळे काका,पुरुषोत्तम सोनावणे,जाधव सर,शिवसेना पदाधिकारी शैलेश काळे , अमोल मोरे , सचिन पाटील , शुभम निकम ,अड. नेमीचंद येवले जिल्हा प्रमुख,राजू वारकेसामाजिक कार्यकर्ते, विशाल काळे , भाग्यश्री बाविस्कर,लता पाटील,यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप व शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेडी पालक तसेच परिसरातील नागरिक उपस्तीत होते
अध्यक्षीय भाषणात विष्णू भंगाळे यांनी विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या शैक्षणिक साहित्याचा वापर योग्य करावा व वृक्षांचे संवर्धन कसे करावे व विद्यार्थांना त्या वृक्षांचे पालन करण्याची जबाबदारी दिली.
सदर कार्यक्रमासाठी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र बोरसे,प्राथमिक मुख्याध्यापक श्री प्रफुल्ल सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली विजया चौधरी, दिपनंदा पाटील, अनुपमा कोल्हे, स्वाती पगारे,सचिन महाजन, ईशा महाजन,सारिका सरोदे, विजयकुमार नारखेडे, प्रशांत भारंबे,भुषण भोळे यांनी सहकार्य केले.