जळगांव – शहरातील पुस्तक विकी व प्रकाशन व्यवसायात क्षेक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेली वाटचाल यापुढे वृद्धिंगत करून वाचन संस्कृती वाढावी व तरुण पिढी मध्ये खोल रुजावी या हेतूने प्राईम बुक्स पब्लिशिंग हाऊस व तात्या पाटील अभ्यासिका या प्रतिष्ठानाचा उद्घाटन सोहळा गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर दि.२१जुलै रोजी संपन्न होत आहे.
याप्रसंगी श्री संजय पांडे,माजी पोलिस महासंचालक (म.रा) यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात येणार असून पी.ई.तात्या पाटील (अध्यक्ष जिजामाता फाउंडेशन), प्रा.ए.पी.चौधरी,(अध्यक्ष,अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ),प्रा.गोपाळ दर्जी ( संचालक – दर्जी स्पर्धा परीक्षा फाउंडेशन),शशिकांत हिंगोणेकर (माजी विभागीय सचिव, लातूर बोर्ड) हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्वातंत्र्य चौकातील मोहिते कॉम्प्लेक्स येथे सकाळी १०.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याला उपस्थिती देण्याचे आवाहन
निमंत्रक प्रदीप पाटील (प्राईम बुक्स – पब्लिशिंग हाऊस, प्राईम स्टडी हब) यांनी केले आहे.