Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्या"बालगंधर्व एक नक्षत्र" मैफिलीचे बुधवारी आयोजन

“बालगंधर्व एक नक्षत्र” मैफिलीचे बुधवारी आयोजन

जळगाव : येथील गंधार कला मंडळ आणि म्हाळस परिवारातर्फे बुधवार, दि.२६ जून रोजी “बालगंधर्व एक नक्षत्र” ही बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त मैफिल होणार आहे.

या मैफिलीत युवा गायिका स्वरमयी देशमुख ही शास्त्रीय संगीत आणि बालगंधर्वांची काही अजरामर नाट्यगीते सादर करून मैफिल सजवणार आहे. स्वरमयी देशमुख ही संगीत विशारद असून अनेक पुरस्कार तिला प्राप्त झाले आहे.

तिला संवादिनी साथ गणेश देसले तर तबला संगत मिलिंद देशमुख करणार आहे.

बुधवारी सायंकाळी ५ वाजता होणारी ही मैफिल बळीराम पेठेतील हेमंत म्हाळस, आसरा संकुल, बळीराम मंदिराजवळ येथे होणार आहे.

बालगंधर्व हे प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांनी त्यांचे मामा आबासाहेब म्हाळस यांच्या बळीराम पेठेतील निवासस्थानी गायनाचे धडे गिरवले होते.

त्याच ठिकाणी ही मैफिल होणार आहे. तरी सर्व रसिकांनी या मैफिलीस उपस्थित राहावे, असे आवाहन गंधार कला मंडळ आणि म्हाळस परिवारातर्फे करण्यात आले आहे.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या