जळगांव – शहरातील रामदास आयुर्वेदिक फार्मसी (विष्णू प्रॉडक्ट) तर्फे पंढरपूर येथे अमळनेर येथून सखाराम महाराज भक्त परिवारातील वारकऱ्यांना मार्गक्रमण करत असताना आरोग्य रक्षण व्हावे या हेतूने
मोफत औषधे प.पू.प्रसाद महाराज यांचे कडे संचालक श्री निलेश पाठक यांनी अमळनेर येथे भेट देवून सुपूर्द केले. दरवर्षी हा सामाजिक व सेवाभावी उपक्रम रामदास आयुर्वेदिक फार्मसीचे माध्यमातून पाठक परिवारा तर्फे राबवला जात आहे.
वारकरी बांधवांना आरोग्य रक्षणा साठी सर्दी,कफ, खोकला, अपचन, गॅसेस, पोटाचे विकार तसेच वात विकार (jont pain),पाय, गुडघेदुखी, यांचा त्रास होवू नये यासाठी या औषधांचा लाभ होणार आहे.