अमळनेर – अमळनेर तालुक्याचे माजी केमिस्ट संघटना अध्यक्ष व सध्या ई.सी मेंबर पदावर कार्यरत,धडाडी उत्साहाने कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद दादा डेरे यांचे दि.३१ मे रोजी उपचार घेत असताना सकाळी ८ वाजता अकस्मात निधन झाले.
त्यांच्या अकाली सोडून जाण्याने अमळनेर तालुक्यातील केमिस्ट संघटनेत अतिशय जबाबदार, होतकरू ,उत्साही सेवाभाव ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात रुजला होता.असे जिव्हाळा जपणारे दादा आम्हाला सोडून गेल्याने ,हरपल्याने संघटनेची अतोनात हानी झाली आहे .त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून निघणे शक्य नाही.त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आदर्श सर्व केमिस्ट बांधवांनी घ्यावा. व या पुढे अमळनेर तालुक्यातील इतर पदाधिकाऱ्यांची मिलिंद दादा यांचा वारसा चालवून पुढील वाटचाल साधावीअशी अपेक्षा अ. भा.केमिस्ट संघटनेचे सदस्य जळगाव जिल्हा केमिस्ट संघटना अध्यक्ष सुनिल भंगाळे यांनीअंत्ययात्रे प्रसंगी आपल्या शोकपूर्ण मनोगतातून व्यक्त केली.
या प्रसंगी जिल्हा केमिस्ट संघटनेचे सचिवअनिल झवर , कोषाध्यक्ष शामकांत वाणी,ब्रजेश जैन, संजय नारखेडे ,खालिद बादशाह ,रमाकांत पाटील,दिनेश मालू,यांचेसह तालुका केमिस्ट संघटनेचे समीर गुळवे, साहेबराव भोई,विलास बर्डे,तसेच अमळनेर,धरणगाव, चाळीसगाव पारोळा,चोपडा व इतर तालुक्यातील केमिस्ट पदाधिकारी,केमिस्ट बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अमळनेर शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्ती अंत्ययात्रेत सहभागी झाले होते शोकाकुल वातावरणात सायंकाळी ७ वाजता चोपडा रस्त्यावरील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले..