जळगांव – दि.3 (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) सुरभी बहुुद्देशिय महिला मंडळाच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल मध्ये बाळंतीण महिलांना व बालकांना, झबली, दुपटी, साड्या, कापडी पिशव्या, पौष्टिक खाऊ व खिचडी, नाश्ता एकूण 25 महिलांना वाटण्यात आला.
दरवर्षी विविध समाजिक संस्थांमध्ये जाऊन वर्धापनंदिन साजरा करण्यात येतो.ह्यावेळी अध्यक्षा सौ स्वाती कुलकर्णी ,मानसी जोशी, निलिमा नाईक, अश्विनी जोशी, मेघा नाईक, पूनम जोशी, सुनीता सातपुते, संजीवनी नांदेडकर, सविता नाईक, स्मिता बंगाली उपस्थित होत्या. मंजुषा राव व सेवालयाचे श्री संदीपजी कासार व सरला कोळी व सिव्हिल कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
वर्धापन दिनानिमित्त सभासदांसाठी 8 ता ला आंबेडकर उद्यानात विविध स्पर्धा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आल्याचे अध्यक्षा सौ स्वाती कुलकर्णी हयांनी सांगितले.