Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्यासुरभी वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सुरभी वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगांव – (प्रतिनिधी) सुरभी बहुुद्देशिय महिला मंडळातर्फे २३ व्या वर्धापन दिनानिमित्त आंबेडकर उद्यानात स्नेहभोजनाचा व विविध स्पर्धांचा कार्यक्रम घेण्यात आला. सुरवातीला प्रस्ताविक अध्यक्षा सौ स्वाती कुलकर्णी ह्यांनी केले. स्पर्धेचे नियोजन व सूत्रसंचालन मानसी जोशी व पूनम जोशी ह्यांनी केले.बांगडी अडकविणे,स्पर्धेत प्रथम अंजली धवसे ,द्वितीय – सौ वैशाली ढेपे रबर अडकविणे स्पर्धेत प्रथम -सौ सोनाली करमरकर द्वितीय ,सौ प्रिता झरेकर सरप्राईझ गेम मध्ये मंडळा वर प्रश्न विचारण्यात आले होते त्यात  स्वाती विजय कुलकर्णी,दीपाली जोशी ,वैदेही नाखरे,मोनाली जोशी लता काळे ह्यांना बक्षिसे मिळाले.कुंदा जोशी ह्यांनी भजन व उखाणे सादर केले.

मंडळातील सभासदांनी 100% मतदान केल्या बद्दल अध्यक्षा सौ स्वाती कुलकर्णी ह्यांनी सभासदांचे आभार मानले. व पुढील वर्षात होणाऱ्या कार्यक्रमांविषयी चर्चा केली.

निलिमा नाईक,अश्विनी जोशी,मानसी जोशी, पूनम जोशी, मेघा नाईक, सुनीता सातपुते, आशा जोशी, अविता जोशी, स्मिता बंगाली, अंजली धवसे, चैताली मोरदे ,देवेंद्र मोरदे ह्यांनी सहकार्य केले.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या