Saturday, December 21, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याऑर्किड नेचर फाउंडेशनचे अध्यक्षपदी आर एन कुलकर्णी यांची निवड..

ऑर्किड नेचर फाउंडेशनचे अध्यक्षपदी आर एन कुलकर्णी यांची निवड..

जळगांव – दि २ (धर्म साथी मीडिया नेटवर्क) ऑर्किड नेचर फाउंडेशनची वार्षिक सभा रानवसा फार्म हाऊस कंडारी रोड जळगाव येथे येथे सकाळी ११ वाजता उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाली.

मावळते अध्यक्ष श्री किशोर महाजन यांनी आपल्या पदाची सूत्रे पुढील तीन वर्षासाठी श्री आर . एन कुलकर्णी यांना प्रदान केली तर सचिव पदाची सूत्रे श्री नाना वाघ यांनी सौ सुनीता सोमनाथ महाजन यांचे कडे पदभार सुपूर्द केला खजिनदारपदी श्री नितीन अठरावलकर यांची निवड झाली.

श्री दिगंबर महाजन यांनी पक्ष्यांचे स्थलांतर त्यांचे आयुष्य याविषयी मार्गदर्शन केले तसेच श्री दिलीप भारंबे सर यांनी सौ सुनीता महाजन यांनी पर्यावरण रक्षण यासंबंधीचे विचार व्यक्त केले. सभेच्या सुरुवातीस श्री नाना वाघ यांनी दिवंगत सदस्य संजय गुळवे, अरुण देशपांडे, आर.ए.चौधरी सर यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर संस्थेचे आधारस्तंभ प्रा. वसंत सोनवणे दिलीप चोपडा आर.ए.पाटील. दीपक तांबोळी,अविनाश भोळे,जयंत राणे,किरण व हेमलता खडके,आरती महाजन यांचा सत्कार करण्यात आला.

श्रीरंग कुलकर्णी हे दरवर्षी प्रति ऑडिट करून देतात त्यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला. वरील कार्यक्रमास ऑर्किड नेचर क्लबचे ३५ सदस्य उपस्थित होते.

शशिकांत पाटील,दीपक तांबोळी ,नाना वाघ, दिगंबर वाणी, अर्चना अट्रावलकर, हर्षदा कुलकर्णी रविंद्र पाटील दिगंबर कोल्हे,किरण व हेमलता खडके, अजित काळे,अविनाश भोळे,जयंत राणे,प्रा.दिलीप भारंबे व इतर महिला सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

नेचर संस्था दरवर्षी वृक्षारोपण परळवाटप पक्षी निरीक्षण निसर्ग सहली प्लास्टिक निर्मूलन चर्चासत्र असे वर्षभर निरनिराळे कार्यक्रम करीत असते ज्यांना वरील विषयात ऋची असेल त्यांची संस्था सदस्य पद देऊन स्वागत करेल असे नूतन अध्यक्ष श्री.आर.एन.कुलकर्णी यांनी जाहीर केले असून जानेवारी २०२५ ला बारीपाडा व तोरणमाळ येथे निसर्ग सहलीचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या