जळगाव – दि.२७(प्रतिनिधि)पलक झवर लिखित “पलको से खुली कल्पनाए’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.
प्रियपल भूमी टाकरखेडा रोड,उत्तर महाराष्ट्र विद्या पीठाच्या मागील बाजूस सायंकाळी ५ वाजता या कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले असून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.
तसेच कवियत्री बहिणाबाई चौधरी (उमवि) कुलगुरू श्री.विजय माहेश्वरी, किड्स गुरुकुलच्या मुख्याध्यापिका मिनल जैन मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभत आहे.
तरी पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थिती देवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन स्वागत उत्सुक आयोजक जवाहरलाल झवर,सौ.लीलावती झवर,डॉ.भूषण झवर,सौ.प्रियंका झवर यांनी केले आहे.