Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याश्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती श्री. मंगेश महाराज यांनी बजावला मतदानाचा हक्क..

श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती श्री. मंगेश महाराज यांनी बजावला मतदानाचा हक्क..

जळगांव – दि.२० जळगांव शहराचे ग्रामदैवत श्री राम मंदिर संस्थानचे विद्यमान गादीपती प.पू.श्री.मंगेश महाराज जोशी यांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवत आज सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला.

या प्रसंगी श्री मंगेश महाराज यांनी मतदानाचे महत्व विषद करताना सांगितले की देशाच्या व राज्याच्या विकासासाठी सर्वांनी या दिवशी मतदान या राष्ट्रीय
कर्तव्याला हजर राहून पवित्र कार्यात सहभागी होवून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे. व सर्वांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन देखील त्यांनी या वेळी केले.

त्यांचे समवेत श्रीराम मंदिर संस्थानच्या धार्मिक सेवेत कार्यरत सुपुत्र श्री श्रीराम महाराज यांनी देखील प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावला.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या