जळगाव (प्रतिनिधी) शहर विधानसभा मतदार संघाचे भाजप, शिवसेना व महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचारार्थ शहरातून वाहनावरून रॅली काढण्यात आली. रॅलीला नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देऊन आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.सुरुवातीला केंद्रीय राज्यमंत्री खा. रक्षा खडसे यांनी, गेल्या दहा वर्षांमध्ये जळगाव शहरांमध्ये विकास कामाची गंगा आणून चांगले दिवस दाखवणारे आ.राजूमामा भोळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन जनतेला केले. यानंतर रॅलीला सुरुवात झाली. मोठ्या वाहनांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आ.राजूमामा भोळे यांच्यासह महायुतीच्या मान्यवरांनी नागरिकांना अभिवादन करून आशीर्वाद घेतले.
रॅली शिवतीर्थसमोरील भाजप कार्यालयापासून रेल्वे स्टेशन, टॉवर चौक, दाणा बाजार, पांडे डेअरी चौक, शिरसोली नाका, काव्यरत्नावली चौक, अजिंठा विश्रामगृह, एम. जे.कॉलेज, प्रभात चौक, रिंग रोड मार्गे पुन्हा शिवतीर्थ चौकात विसर्जित झाली. रॅलीच्या मार्गात महामानवांना आ.राजूमामा भोळे यांनी अभिवादन केले.
रॅलीमध्ये भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद मेटकर, राज्य पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम, शिवसेना महानगर प्रमुख संतोष पाटील, माजी महापौर ललित कोल्हे, महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पिरीपचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्यासह भाजपाचे सर्व मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी, महिला व सर्व आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.