लेवा नवयुवक संघाचा भव्य उपक्रम
जळगांव – दि.१६ (प्रतिनिधी) लेवा पाटीदार समाजतील विश्व स्तरीय विवाहेच्शुक वधू-वर महामेळावा आज दि.१७ रविवार रोजी माधुरी वेअर हाऊस काशिनाथ लॉज मागे म्हाडा कॉलनी समोर एमआयडीसी जळगांव येथे आयोजित करण्यात आला आहे या महामेळाव्यात लेवा समाजातील शेतकरी,कामगार, शेतमजूर ते व्यापारी,उच्च शिक्षित,वैद्यकीय,औषधी शास्त्र,अंतराळ अश्या वेगवेगळया सर्वस्तरिय घटकांचा परिचय एकच ठिकाणी एकाच व्यासपिठावर होणार आहे.अश्या सर्वच घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न लेवा नवयुवक संघातर्फे या भव्य उत्स्फूर्त आयोजनातून करत आहे
लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुक वधू-वरांची परिचय पुस्तिका देखील तयार झाली असून ती फक्त समाज बांधवांसाठी उपलब्ध होणार आहे.लेवा समाजातील विवाहेच्छुक वधुंची एकूण संख्या १६०० तर वरांची संख्या ३००० आहे.एकूण ४६०० नावे या सूची मध्ये नोंदली आहे.विश्र्वभरातील नावे संकलन केंद्राद्वारे नावे नोंदवण्यात आली होती.
मनपसंत जोडीदार मिळावा व विवाह संस्था टिकून रहावी, सुदृढ समाज निर्मिती होवून राष्ट्र उभारणी कामी हातभार लागावा या साठी हा उपक्रम गेल्या ३५ वर्षापासून लेवा नवयुवक संघ जळगाव शहरात राबवत आहे.
या विश्वस्तरीय महामेळाव्यास अत्याधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर करण्यात आला असून ठीकठिकाणी
एलईडी फ्लेक्स बोर्ड बसवले जाणार आहेत तसेच मेळाव्यात सहभागी होणाऱ्या समाज बांधवांना भरपेट नाश्ता, विनामूल्य चहा, व मिनरल वॉटरची सुविधा देण्यात आली आहे.हा मेळावा सकाळी १० वाजता सुरू होणार असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे.लेवा समाजातील सर्वस्तरीय मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तरी समाजातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने महा मेळाव्यात सहभागी व्हावे तसेच वधू वरानी आपला परिचय द्यावा असे आवाहन लेवा नवयुवक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी यांनी केले आहे. अधिक माहिती साठी प्रा.सुभाष भोळे ,हिमालय ट्रॅक्टर जळगांव यांचेशी ८०५५५१७३७७,८०५५५६७३७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.