Monday, December 23, 2024
Google search engine
Homeजळगाव शहरखंडेलवाल समाज व पाथरवट विकास मंडळाचा आ.राजू मामा भोळे यांना जाहीर पाठिंबा

खंडेलवाल समाज व पाथरवट विकास मंडळाचा आ.राजू मामा भोळे यांना जाहीर पाठिंबा

जळगाव (प्रतिनिधी) : येथील खंडेलवाल समाज आणि अखिल भारतीय पाथरवट समाज महासंघाने शहर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना पत्राद्वारे जाहीर पाठिंबा देऊन समाज बांधवांना आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

खंडेलवाल समाज, जळगाव शहरातर्फे एका पत्राद्वारे आमदार राजूमामा भोळे यांना पाठिंबा देण्यात आला. जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील आपल्या हातून अखंड सेवा घडत राहो. जळगावकरांच्या सुखदुःखात आपण नेहमी सहभागी होत रहा. आगामी निवडणुकीतील विजयासाठी आपल्याला भरघोस शुभेच्छा अशा आशयाचे पत्र खंडेलवाल समाजातर्फे देण्यात आले आहे.

तर अखिल भारतीय पाथरवट समाज महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष योगेश पाथरवट यांनी देखील जाहीर पाठिंबाचे पत्र आ. भोळे यांना दिले आहे. समस्त पाथरवट समाजाच्या उत्कर्षासाठी आपण अहोरात्र झटत आहात. विधानसभा निवडणुकीमध्ये पाथरवट समाज आपल्या पाठीशी असून समाजबांधवांनी महायुतीचे उमेदवार आ. भोळे यांना विजयी करावे असे आवाहन देखील युवा जिल्हाध्यक्ष योगेश पाथरवट यांनी पत्रामध्ये केले आहे.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या