जळगाव । मागील दहा वर्षापासून जळगाव शहराला आमदार सुरेश भोळे यांच्या सारखे नेतृत्व लाभले असून त्यामुळे आमच्या अनेक समस्या सुटल्या आहे. नेहमी प्रमाणे या निवडणुकीत देखील तांबट सामाजाचा आपल्याला पाठींबा राहणार असल्याचे पत्र त्वष्टा तांबट समाज विकास मंडळातर्फे आमदार सुरेश भोळे यांना देण्यात आले. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आपण भविष्यात देखील शहराच्या विकासासाठी कामे करावी असेही तांबट समाजतर्फे सांगण्यात आले.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात हे पत्र देण्यात आले. या पाठींब्याबद्दल आमदार सुरेश भोळे यांनी समस्या तांबट समाजाचे आभार मानले व सदैव आपल्या सेवेत राहण्याचे व विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. यावेळी तांबट समाजाचे अध्यक्ष कैलास तांबट, उपाध्यक्ष सदाशिव तांबट, सुधीर तांबट, स्वप्नील तांबट, नितीन जांगडे, पदमाकर तांबट, यांसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.