जळगाव – दि १४ येथील निवृत्ती नगर मधील केरळी महिला ट्रस्टचे अयप्पा स्वामी मंदीरात कार्तिक पौर्णिमा उत्सवास आज शुक्रवार दि १५ पासून प्रारंभ होत आहे. १५ रोजी सकाळी १०.३० वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येवून १६ नोव्हे सकाळी ७.३० पर्यंत दर्शन घेता येणार आहे.उत्तर महाराष्ट्रात जळगावातील केरळी महिला ट्रस्टच्या या मंदिराची प्राणप्रतिष्ठा शास्त्रोक्त पध्दतीने केली असून पोर्णिमेचा हा मुहुर्त देखिल केरळातील गुरूजींशी बोलून शास्त्रोक्त पध्दतीने काढला जातो हे या मंदिराचे वैशिष्ट आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव केरळी महिला ट्रस्ट जळगावात निवृत्ती नगरातील अयप्पा स्वामी मंदीरात साजरा करीत असतात.
या वर्षी दि १५ नोव्हे रोजी सकाळी १० वा ३० मि. ते १६ नोव्हे सकाळी ७ वा ३० मि. पर्यंत पोर्णिमा आणि कृतिका नक्षत्र असून शुभ मुहुर्त १५ नोव्हे दु ४ वा १९ मि. ते १६ पहाटे २ वा ५९ मि. असा आहे. तर कृतिका नक्षत्राची वेळ पहाटे २ वा ५९ मि. सूरू होवून १६ नोव्हें रोजी सकाळी ७ वा ३० मि समाप्त होईल असे ट्रस्टमार्फत कळवण्यात आले आहे. उत्सवाची तयारी पुर्ण झाली असून मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. याचबरोबर स्त्री पुरूष यांना वेगवेगळया रांगेत राहून दर्शन करता येणार आहे. ज्या भाविकांना अभिषेक करावयाचा असल्यास गुरूजींना स्वतंत्र बसण्याची देखिल व्यवस्था केली आहे.
मंदीरासाठी देणगी स्वीकारण्यासाठी देखिल कक्ष करण्यात आला असून जास्तीत जास्त भाविकांनी दर्शन घ्यावे असे आवाहन ट्रस्टमार्फेत केले आहे. भक्तीभावाने जर प्रार्थना केली तर कार्तिकस्वामी आर्शिवाद देतात पण त्यांना आवडणारे मोरपिस भाविक आणतात व श्रध्देने वाहतात अशा प्रकारे मोरपिस वाहून पूजा टाळावी असे देखिल आवाहन मंडळाने केले आहे. अधिक माहितीसाठी केरळी महिला ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष श्रीमती वासंती अयर यांचेशी ९४०५१४३२३५ या क्रमांकवर संपर्क साधावा.