जळगांव – दि.१३ (धर्मसाथी न्यूज नेटवर्क) जळगांव शहराचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या वहनोस्त्वातील शेवटचे रासक्रीडा वहनाचे भव्य स्वागत ब्राह्मण सभेतर्फे रात्री जल्लोषात करण्यात आले.
या प्रसंगी सभेच्या संचालकांच्या वतीने वहनाचे पूजन करत वहनावर आरूढ देवतांची आरती करण्यात आली.
वहन उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या समितीतील पदाधिकारी व सदस्यांचा भेट देवून यथोचित सन्मान करण्यात आला.
ब्राह्मण सभेतर्फे धार्मिक संस्कृती प्रौत्सहित करणारे कार्य– – श्री.मंगेश महाराज
तसेच श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमान गादीपती मा. श्री.मंगेश महाराज यांचे पाद्यपुजन करून ब्राह्मण सभेच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.महाराजांच्या शुभहस्ते आशिर्वाद रुपात सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांना श्रीफळ व प्रसाद वितरित करण्यात आला.तसेच ब्राह्मण सभेच्या अश्या प्रकारच्या आयोजनाने समाजातील संस्कृती वर्धनाचे महत्वपूर्ण कार्य घडत असल्याने पुढील पिढीत धार्मिक संस्काराचे महत्व रुजत असल्याची भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त करून ब्राह्मण सभेच्या वाटचालीसाठी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी समाज बांधव,सदस्य,परिसरातील रहिवासी,माता भगिनी आदींची मोठी उपस्थिती होती.ब्राह्मण सभेच्या आवारात विशेष सजावट,रोषणाई करण्यात आली होती.
रासक्रीडा वहनाच्या पानसुपारी व पूजन सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री.नितीन कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी अमोल जोशी,ॲड.अजय जोशी,संदीप कुलकर्णी,किरण कुळकर्णी,कमलाकर फडणीस राजेश कुळकर्णी,हेमंत वैद्य,श्रध्दा कुळकर्णी,व्यवस्थापक श्याम कुळकर्णी, कर्मचारी तायडे बुवा आदींनी परिश्रम घेतले.