जळगांव – दि.१२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)जलग्राम दैवत श्रीराम मंदिर संस्थान आयोजित प्रतिवार्षिक जळगांव श्रीराम रथोत्सव आपल्या जळगांव शहरात आज सालाबादप्रमाणे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला होता.निवडणूक प्रचार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत असताना देखील प्रचार बाजूला ठेवून आ.राजू मामा यांनी श्रीराम रथ उत्सवाच्या विधिवत पूजन सोहळ्याला पूर्ण वेळ उपस्थिती दिली.या प्रसंगी माजी महापौर सौ.सीमाताई भोळे यांची देखील सोहळ्याला उपस्थिती होती.
या जळगांवचे भूषण महणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम रथोत्सवानिमित्त उपस्थित राहून श्री रामरायाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच आपल्या जळगांव शहराच्या विकसित समृद्धीसाठी मनःपूर्वक प्रार्थना केली.त्यासाठी आशिर्वाद लाभू दे,अखंड जनसेवा घडू दे..अशी कामना त्यांनी व्यक्त केली.
या निमित्ताने श्री.मंगेशजी महाराज आणि श्री.गुरू बाळकृष्णजी महाराज यांची उपस्थिती होती.हा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी भाविक भक्त मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.