Saturday, December 21, 2024
Google search engine
Homeजळगाव शहरमनसे उमेदवार डॉ.अनुज पाटील यांनी साधला बी.जे.मार्केट व्यापारी बांधवांशी संवाद..

मनसे उमेदवार डॉ.अनुज पाटील यांनी साधला बी.जे.मार्केट व्यापारी बांधवांशी संवाद..

जळगांव – दि.८  (प्रतिनिधी) जळगाव शहर विधानसभेचे मनसेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांनी जळगाव शहरातील जुने बी जे मार्केट आणि नवीन बी जे मार्केटमधील व्यापाऱ्यांशी प्रचारादरम्यान संवाद साधला.

त्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या, अडचणी आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक उपायांवर चर्चा केली. डॉ. पाटील यांनी व्यापारी वर्गाचे हित लक्षात घेऊन त्यांचे मुद्दे मनापासून ऐकले आणि त्यांच्या व्यवसाय वृद्धी व सोयीसुविधांसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत आपल्या योजना मांडल्या.

संवादात डॉ. पाटील यांनी स्थानिक व्यवसायाच्या प्रगतीसाठी मनसेचे ध्येय आणि धोरणे स्पष्ट केली. त्यांनी व्यापाऱ्यांना दिलासा देत आश्वासन दिले की, निवडून आल्यास ते व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण करतील, मार्केटमधील पायाभूत सुविधा सुधारतील, तसेच व्यापाऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न करतील. त्यांचा उद्देश जळगाव शहरातील व्यावसायिक वातावरण अधिक मजबूत आणि सुविधा-संपन्न बनवणे आहे.

या चर्चेमुळे व्यापाऱ्यांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या असून, डॉ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यवसाय व विकासासाठी समर्थन मिळेल, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या