जळगांव – दि.८ (प्रतिनिधी) जळगाव तालुका केमिस्ट असो.ची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.८ रोजी केमिस्ट भवनात उत्साहात पार पडली.
सभेसाठी जिल्हाध्यक्ष श्री सुनीलभाऊ भंगाळे, श्री श्रीकांत दुबे (महाराष्ट्र स्टेट बीजेपी प्रकोष्ट अध्यक्ष) तसेच आमदार राजू मामा भोळे, जिल्हा सेक्रेटरी अनिलजी झंवर, कोषाध्यक्ष श्री शामकांत वाणी, श्री दिनेश मालू, श्री ब्रजेश जैन, तालुकाध्यक्ष साहेबराव भोई, तालुका सचिव समीर गुळवे, विलास बर्डे, दीपक चौधरी बाळकृष्ण सोनवणे, किशोर बारी व शहरातील सर्व केमिस्ट बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी तालुका अध्यक्ष यांनी आलेल्या सर्व पदाधिकारी ,निमंत्रित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकात वर्षभरातील संघटन,तसेच तालुक्यातील केमिस्ट बांधवांच्या समस्या जिल्हा पदाधिकारी यांचे समक्ष मांडल्या याप्रसंगी विशेष आमंत्रित मान्यवर आ.राजू मामा भोळे यांचा सत्कार संघटनेचे पदाधिकारी भानुदास नाईक व ज्येष्ठ केमिस्ट विनय काबरा यांचे हस्ते करण्यात आला,तसेच तालुका सचिव समीर गुळवे यांनी आपल्या वर्षभरातील आयोजन केलेल्या व पुढील कालवधित आयोजित कार्यक्रम,प्रकल्प सदर्भात माहिती जिल्हा पदाधिकारी यांचे समोर सादर केली.
जिल्हा कार्यकारिणी सचिव तथा ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल भाऊ झवर यांनी आपल्या दिशादायक मार्गदर्शनात संघटनात्मक तसेच रीटेलर केमिस्टच्या विविधांगी समस्यांसंदर्भात अनेक बाबींवर प्रकाशझोत टाकला.
परिवर्तन स्वीकारावे लागेल – श्री सुनील भंगाळे
जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांनी अध्यक्षीय मनोगतात उपस्थित केमिस्ट बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्याला पुढील वाटचालीसाठी समोर उभे असलेले आव्हान पेलताना अनेक ठिकाणी परिवर्तन स्वीकारावे लागेल.आपल्या कार्यशैलीत शिस्त,गांभीर्य आणून बदल करावा लागेल संघटनेचे महत्व केमिस्टला संकट आल्यावरच कळते त्यानंतर संघटनेच्या कार्यासाठी
सातत्य ठेवण्याची गरज त्याला वाटणे गरजेचे आहे.तसेच पुढील वाटचालीसाठी केमिस्टला सहकार्य करणाऱ्या राजकीय पक्षालाच आपल्याला मदत करायची आहे तसे आवाहन आपण करणार आहोत.असेही त्यांनी सांगितले जळगाव जिल्ह्यातील भाजपा प्रकोष्ट कार्याची माहिती त्यांनी दिली.
आ.भोळे यांना सहकार्य करावे – श्रीकांत डूबे
राज्य भाजपा प्रकोष्ट अध्यक्ष श्रीकांत डुबे यांनी आपल्या मनोगतात जळगाव जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत महायुती उमेदवार आ.राजूमामा भोळे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी त्यांनी केमिस्ट बांधवांना आवाहन केले.
केमिस्ट परिवार समाजाचा आधारस्तंभ
त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी वचनबध्द..आ.भोळे
जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेची वाटचाल प्रेरणादायी असून कार्यतत्पर जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांचे दिशा दायी नेतृत्व या संघटनेचा कणा आहे.आपल्या संघटनेच्या केमिस्ट बांधवंच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्राची
महत्वपूर्ण नियमित सेवा समाजाला महत्वपूर्ण योगदान देत आहे.सामाजिक क्षेत्रात देखील मोठे कार्य आपल्या संघटनेच्या माध्यमातून केले जाते त्याचा अभिमान आहे.आपल्या संघटनेच्या समस्या सोडवण्यासाठी मी वचनबध्द असून आपण सर्वांनी केमिस्ट परिवाराने आशिर्वाद देवून माझ्या पाठीशी उभे राहून सहकार्य करावे व मोठ्या संख्येने आपल्या हक्काच्या माणसाला मतदान करावे असे विनंतीपूर्वक आवाहन त्यांनी या प्रसंगी केले..